जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध मुलभूत सुविधेबाबतची शाळानिहाय माहिती उपलब्ध करुन देणेबाबत jilha parishad shala basic information
संदर्भ :- मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांची दि. 07/02/2025 रोजीची बैठक,
मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांनी दि.07/02/2025 रोजी जिल्हा परिषद शाळेतील उपलब्ध मुलभूत सुविधेबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने शाळानिहाय आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील उपलब्ध मुलभूत सुविधा, उपलब्ध जागा संदर्भातील सर्व अद्ययावत शाळानिहाय माहिती दि. 12/02/2025 रोजीपर्यंत सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
सदरील सुचनेच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या प्रपत्रामध्ये शाळानिहाय माहिती (Excel File) भरुन ईमेलद्वारे या कार्यालयास पाठविण्यात यावी.