क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी १०० दिवसांच्या कृति आराखड्याबाबत hundred days action plan gr
प्रस्तावना.
“क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृति आराखडा” या विषयावर मा. मुख्यमंत्री यांनी मंगळवार, दि. ०७.०१.२०२५ रोजी, दुपारी १२:३० वाजता, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दृक परिषदेद्वारे (Video Conferencing), मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास, गृहनिर्माण), मा.उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) व मा. मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत संबोधित केले.
२. राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता आगामी १०० दिवसांमध्ये पुढील मुद्द्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले:-
१) संकेतस्थळ (Website);
२) सुकर जीवनमान (Ease of Living);
३) स्वच्छता (Cleanliness);
४) जनतेच्या तक्रारींचे निवारण
(Grievance Redressal);
५) कार्यालयातील सोयी व सुविधा (Amenities at work place);
६) गुंतवणूक प्रसार (Investment promotion),
७) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field visits).
शासन निर्णय..
उपरोक्त पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी आगामी १०० दिवसांमध्ये सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कृति आराखड्यानुसार कार्यवाही करावी.
. सदर कृति आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता पोलीस दलाच्या कार्यालयांच्या बाबतीत संबंधित पोलीस आयुक्त किंवा, यथास्थिती परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. इतर सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या बाबतीत संबंधित विभागीय आयुक्त हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.
३. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०११३१६४७१३३६०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,