बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, निकोप वातावरणात सुरळीत पार पाडण्याचे मा. उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन hsc ssc board exam
प्रिय विद्यार्थ्यांनो,
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत अत्यंत महत्वाच्या असलेल्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, निकोप वातावरणात सुरळीत पार पाडाव्यात यासाठी राज्याच्या सन्मानननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत माननीय शिक्षणमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मो, अजित आशाताई अनंतराव पवार आपणास पुढील आवाहन करीत आहे.
विद्यार्थी म्हणून तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा महत्वाचा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त, आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आवाहन आहे की, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी.
आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटीबध्द आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रीयेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकतेने आणि न्याय मार्गाने शिक्षणाला पुढे नेऊयात !
जय