हिंदवी स्वराज्य (महादुर्ग) महोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता देण्याबाबत hindavi swarajya mahadurg mahotsav
शिवनेरी किल्ला, ता. जुन्नर, जि. पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त “हिंदवी स्वराज्य (महादुर्ग) महोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता देण्याबाबत शुध्दीपत्रक
संदर्भ : पर्यटन विभाग, शासन निर्णय क्र. टिडीएस २०२५/०१/प्र.क्र.०८/पर्यटन-३, दि.०५/०२/२०२५
शासन शुध्दीपत्रक :
उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये शिवनेरी किल्ला, ता. जुन्नर, जि. पुणे येथे आयोजन करण्यात मान्यता देण्यात आलेल्या “हिंदवी स्वराज्य (महादुर्ग) महोत्सवाची तारीख “दि.१९ ते २१ फेब्रुवारी, २०२५ या ऐवजी दिनांक १७ ते १९ फेब्रुवारी, २०२५” अशी वाचण्यात यावी.
०२. उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील इतर अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.
०३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०२०६११४८३४००२३ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांगे,