या कर्मचाऱ्यांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातून घेणे बाबत gps biomatric attandance
महोदय,
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत काही जिल्हा परिषदांकडून माहिती प्राप्त झालेली आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली/फेस रिडिंग प्रणाली या सारख्या अद्ययावत यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविली जाते. ग्रामसेवकांच्या बाबतीत ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागाच्या जवळ आहेत अशा ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रीक हजेरी राबविण्यात येते.
३. अतिदुर्गम, डोंगराळ भागात Network Connectivity नसल्यामुळे बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे हजेरी प्रक्रिया राबविण्यास समस्या येऊ शकतात. तथापि, सध्यस्थितीत बहुतांश भागामध्ये Network Connectivity उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायती ह्या शहरी भागालगत आहेत, किंवा ज्या-ज्या ठिकाणी Network Connectivity उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये बायोमॅट्रिक/जीपीएस हजेरी प्रक्रिया राबविणे शक्य आहे. तरी ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांची बायोमॅट्रिक/जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरुन कगागानानन उचित निर्णय घ्यावा, ही विनंती.