“दुर्गे दुर्घटभारी तुजवीण संसारी” दुर्गा आरती durga arti sangraha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“दुर्गे दुर्घटभारी तुजवीण संसारी” दुर्गा आरती durga arti sangraha 

दुर्गे दुर्घटभारी तुजवीण संसारी ।

अनाथ नाथे अम्बे करुणाविस्तारी ।

वारी वारी जन्म मरणांते वारी ।

हारी पडलो आता संकट नेवारी ।। १ ।।

जय देवी जय देवी महिषासुरमथिनि ।

सुरवर ईश्वर वरदे तारकसंजीवनी ।। धृ।।

तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही ।

चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।

साही विवाद करिता पडले प्रवाही ।

ते तू भक्तालागी पावसि लवलाही ।। २ ।।

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा ।

क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।

अम्बे तुजवाचून् कोण पुरवील् आशा ।

नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३ ।।

नरहरी सोनार

आरती संग्रह पीडीएफ उपलब्ध डाउनलोड करून घ्या Click here