वाढदिवसाला नवीन मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलानं घेतला गळफास;सांगलीतील घटना dhakkadayak ghatna 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाढदिवसाला नवीन मोबाईल दिला नाही म्हणून नववीत शिकणाऱ्या मुलानं घेतला गळफास;सांगलीतील घटना dhakkadayak ghatna 

वाढदिवसाला नवीन मोबाईल दिला नाही म्हणून 9 वीत शिकणाऱ्या मुलानं गळफास घेऊन संपवलं जीवन; सांगलीतील धक्कादायक घटना

Sangli news-आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांच्या जीवनावर विपरीत परिमाण होत आहे. यातून मुले टोकाचे पावले देखील उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना सांगलीतील मिरज येथे घडली आहे. ९ वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने वाढदिवसाच्या दिवशी आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. मुलाच्या या निर्णयामुळे त्याच्या आई व बहिणीला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज येथील मंगळवार पेठ, कुंकुवाले गल्ली परिसर येथे राहणाऱ्या फुटबॉलपटू व ९ वीत शिकत असलेल्या मुलाने आईकडे मोबाईलचा हट्ट धरला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त आईने वाढदिवसाला नवीन मोबाईल न दिल्याने तो रागावला होता. याच रागातून त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. आज सकाळी तो दिसत नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला. यावेळी टेरेसवर त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याने केलेल्या आत्महत्यमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

नववीत शिकणारा हा मुलगा चांगला फुटबॉलपटू होता. तो पुढील आठवड्यात एका स्पर्धेसाठी बाहेरगावी देखील जाणार होता. मात्र, मोबाईलच्या हट्टापाई त्याने जीवन संपवले. त्याचा परवा वाढदिवस झाला होता. यावेळी त्याने त्याच्या आईला नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह धरला होता. त्याची आई ही येथील एमआयडीसीत कामाला होती. त्यातून ती कसेबसे घर चालवायची. यामुळे तिने मोबाईल घेऊन देण्यास असमर्थता दर्शवली. याचा राग मुलाला आला. तो आईवर नाराजदेखील होता. शनिवारी रात्री आई व बहीण झोपी गेल्यावर तो घराच्या टेरेसवर गेला. या ठिकाणी सोलरसाठी उभा केलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवलं.