महागाई भत्त्याच्या थकबाकीसाठी आग्रही : अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांसह वित्तमंत्र्यांना निवेदन dearness allowance thakitbaki
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांनादेखील त्वरित थकबाकी द्यावी, या मागणीसाठी राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांच्या दरबारी धाव घेतली आहे थकबाकीच्या मागणीसाठी महासंघाकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि न अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन ड दिले असून या प्रकरणी त्वरित निर्णय घेण्याची मागणी महासंघातर्फे करण्यात आल्याची माहिती ग. दि. कुलथे यांनी दिली.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महासंघाने निवेदन दिले आहे. ‘केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलै, २०२४ पासून तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांना महागाई भत्ता ५३ टक्के झाला आहे. राज्य शासनाच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनादेखील ही वाढ पूर्वलक्ष्यी प्रभावाने या आधीच लागू करण्यात आली आहे. केंद्र शासनाप्रमाणे राज्यात महागाई भत्तावाढ देण्याचे राज्य शासनाचे प्रचलित धोरण असल्यामुळे, राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी व सेवानिवृत्तांनादेखील केंद्र शासनाप्रमाणे १ जुलै, २०२४ पासून तीन टक्के महागाई भत्तावाढ, घरभाडे भत्तावाढ तसेच तद्नुषंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनाने विनाविलंब घ्यावा’, अशी मागणी या निवेदनात केली आहे.