शालेय विद्यार्थिनींची पायपीट थांबणार सायकल साठी ५००० रु मिळणार cycle vatap scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय विद्यार्थिनींची पायपीट थांबणार सायकल साठी ५००० रु मिळणार cycle vatap scheme 

अनिल भंडारी लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मानव विकास मिशन अंतर्गत वडवणी तालुक्यातील इयत्ता आठवी ते बारावीच्या ४२९ मुलींना सायकलसाठी पाच हजार रुपये मिळणार आहेत. शून्य ते पाच किलोमीटर परिसरातील गरजू विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे.

मानव विकास अंतर्गत मागासलेल्या तालुक्यात मानव विकास कार्यक्रम राबविला जातो. ग्रामीण भागातील शिक्षणासह विकासासाठी शासनाच्या मापदंडानुसार तालुक्यांची निवड केली जाते. बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात मानव विकास योजनेचा लाभ शासनाच्या विविध योजनांतून दिला जातो. या योजनेंतर्गत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या व शाळेपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या परंतु ज्यांना एसटी बससेवेचा लाभ होत नाही, अशा मुलींना सायकल वाटप करण्यासाठी अनुदान दिले जाते. २०२३-२४ या वर्षासाठी ४२९ मुलींची सायकलसाठी निवड झाली आहे. सायकलसाठी प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे २१ लाख ४५ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार झाला आहे.

cycle vatap scheme 
cycle vatap scheme

मानव विकास जिल्हा समितीच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आहेत. त्यांची समिती लवकरच प्रशासकीय मान्यतेबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. मानव विकास मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे सामाजिक लाभ मिळत आहेत.

 

Leave a Comment