प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे करिअर counselling करण्यासाठी व मानसशास्रीय चाचण्या घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या counselling centres चे सनियंत्रण करण्याबाबत counselling centres controlling
संदर्भ : १ शासन निर्णय दिनांक २४ ऑगस्ट २०१८
२ जाक्र. राशैसंवप्रपम/संकीर्ण/ इतिवृत्त /२०२४/०५१४६, दि.२३/१०२०२४
३ जाक्र. राशैसंवप्रपम/व्यमावसमुवि / करिअर मेळा / २०२४-२५/०५३३७ दि४/११/२०२४ उपरोक्त विषय संदर्भानुसार दरवर्षी प्रस्तुत कार्यालयामार्फत इयत्ता १० वी १२
वीच्या विद्यार्थ्यांचा पुढील व्यवसाय शिक्षणावावत कल जाणून घेणे व त्यानंतर समुपदेशन करण्यासाठी उपक्रम घेतला जातो. यासाठी मानसशास्त्रीय कसोट्याच्या माध्यमातून इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. सदर समुपदेशन कार्यक्रम खालीलप्रमाणे राबविला जातो.
१. विद्यार्थी मुलाखत
२. मानसशास्रीय कसोट्या अ NVTI ब GATB क समायोजन शोधिका /Adjustment Inventory
रसशोधिका /Interest Inventory
३. मुलाखत व कसोट्या यांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांच्या करिअरचा Road map तयार करणे.
४. विद्यार्थ्यांना पालकाच्या उपस्थितीत करिअरविषयक मार्गदर्शन करणे. तसेच पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या
करिअर विषयक शंकांचे निरसन करणे.
संदर्भ १ नुसार प्रत्येक वर्षी परीक्षा झाल्यावर इयत्ता १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर वायत समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत कार्यरत व्यवसाय मार्गदर्शन कक्षामार्फत नियोजन केले जाते.
संदर्भ क ३ नुसार करिअर मेळा या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या
विद्यार्थ्यांना व्यवसायायावत समुपदेशन केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना व्यवसायाचावत शालेय स्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी counselling centres तयार करण्यासाठी सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी वर्ग असणाऱ्या सर्व
शाळांमध्ये खालील निकषाप्रमाणे समुपदेशन कक्ष तयार करण्यात येत आहे.
यासाठी शाळेत कार्यरत किमान ३ शिक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे.
समुपदेशन केंद्रासाठी तज्ञ निवडीचे निकष
१ शिक्षकाकडे किमान विज्ञान/गणित/समाजशास्त्र या विषयाची पदवी असावी.
२ शिक्षकाला अध्यापनाचा किमान ५ वर्षे अनुभव असावा.
३ गटात एक श्री शिक्षकाचा समावेश असावा.
किंवा व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी वेळ देण्यास तयार असावा.
५ शिक्षकाला मानसशास्रीय चाचणी घेण्याचे ज्ञान असावे.
६ शिक्षकाला विद्यार्थ्यांला समुपदेशन करण्याचे ज्ञान असावे.
७ शिक्षकाला वृत्तपत्र वाचनाची आवड असावी.
९ मानसशात्र विषयात पदवी असणाऱ्या शिक्षकाला प्राधान्य देण्यात यावे.
आहेत.
समुपदेशन केंद्र शाळेमध्ये स्थापन करण्यासाठी शाळांनी खालील गोष्टी उपलब्ध करून द्यायाच्या
शाळेसाठी सूचना
१ शाळेत किमान एक मराठी भाषेतील वृत्तपत्र ज्यात विविध व्यवसायाच्या संधी बाबत माहिती दिली जाते
नियमित विद्यार्थी व शिक्षकांना वाचनासाठी उपलब्ध असावे.
२ समुपदेशन केंद्रातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक महिन्यात पालक
सभा घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून यावी.
३ विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा, विविध व्यवसायातील तज्ञ मार्गदर्शक
समुपदेशन केंद्रास उपलब्ध करून द्यावे.
४ परिषदेमार्फत प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३ ते ४ या कालावधीत प्रसारित होणाऱ्या व्यवसाय मार्गदर्शन
वेबिनारचा लाभ विद्यार्थ्यांना अनिवार्यपणे करून द्यावा.
५ मुख्याध्यापकांनी समुपदेशन केंद्राचे सचिव म्हणून कामकाज पाहावे
६ शालेय व्यवस्थापन विकास समितीचे अध्यक्ष यानी सदर केंद्राचे अध्यक्ष म्हणून कामकाज करावे.
७ सदर समुपदेशन केंद्राची वार्षिक योजना विद्यार्थी व वर्ग संख्येनुसार करण्यात यावी.
८ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील व्यवसाय मार्गदर्शन कक्षाला आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी.
वरील प्रमाणे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग असणाऱ्या शाळांना दिनांक २५ डिसेंबर २०२४ पर्यंत समुपदेशन कक्ष स्थापन करण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. याबाबत जिल्ह्यातील संबंधित सर्व शाळांमध्ये सदर समुपदेशन कक्ष स्थापन करण्यासंदर्भात सनियंत्रण करण्यात यावे. सदर शाळांतर्गत कक्ष स्थापन करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधिताना सहकार्य करण्यात यावे.