शालेय शिक्षण विभागांतर्गत अधिकारी यांच्या भेटी किंवा समारंभाच्यावेळी “बुके ऐवजी बुक” देऊन स्वागत करणेबाबत book for inaugration programme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय शिक्षण विभागांतर्गत अधिकारी यांच्या भेटी किंवा समारंभाच्यावेळी “बुके ऐवजी बुक” देऊन स्वागत करणेबाबत book for inaugration programme

शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत सर्व कार्यालये, शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये मान्यवर व्यक्ती आणि अधिकारी यांच्या भेटी किंवा विविध समारंभाच्यावेळी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याऐवजी पुस्तक देऊन (बुके ऐवजी बुक) करण्याबाबत.

संदर्भ-

शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक उपक्रम २३१५/प्र.क्र.२४२/ एस.डी.४, दि. ०७/१०/२०१५

शासन निर्णय pdf download

शासन परिपत्रक :-

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये कामकाजाच्या निमित्ताने मान्यवर व्यक्ती आणि अधिकारी हे या विभागाच्या अखत्यारित येणारी क्षेत्रिय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळांना व क्रीडा संकुलांना भेटी देत असतात. तसेच, या सर्व ठिकाणी विविध निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अशा सर्व भेटीच्या प्रसंगी तसेच कार्यक्रमांच्या आयोजनावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, अधिकारी किंवा प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करण्यासाठी सर्व साधारणपणे पुष्पगुच्छ देण्याची प्रथा आहे.

२. देशाचे माजी राष्ट्रपती तसेच थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दि. १५ ऑक्टोबर हा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत सूचना दि.७.१०.२०१५ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत.

३. विद्यार्थी, शिक्षक व समाजातील विविध घटकांमध्ये वाचन संस्कृती व वाचन प्रेरणा वाढीस लागावी तसेच ज्ञानाचा प्रसार व प्रचार व्हावा यादृष्टीने या विभागाच्या अखत्यारित येणारी सर्व कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा व क्रीडा संकुले इत्यादी ठिकाणी वेळोवेळी आयोजित करण्यात

शासन परिपत्रक क्रमांका उपक्रम २३१५/प्र.क्र.२४२/एस.डी.४

येणा-या समारंभावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, अधिकारी, प्रमुख पाहुणे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याऐवजी पुस्तक देऊन (बुके ऐवजी बुक) करण्यात यावे.

४. सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक) व सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सदर सुचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१५१०१५१२३९३५०५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.