गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पध्दती या विषयावर चर्चासत्राचे आयोजन anandadayi shikshan discussion
महोदय/महोदया,
मा. मंत्री, शालेय शिक्षण यांनी दिलेल्या निर्देशानुसार “गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पध्दती या विषयावर मा. मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि.०५ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ८.३० वा. जयहिंद महाविद्यालय, ए रोड, चर्चगेट, मुंबई येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
शासन निर्णय येथे पहा
आपणास विनंती करण्यात येते की, विषयांकित चर्चासत्राच्या अनुषंगाने अद्ययावत माहितीसह उपस्थित रहावे,
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सूचित करण्यात येते की, राज्यातील प्राथमिक शाळांच्या मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर संघटना, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांच्या मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर संघटना आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या प्रत्येकी तीन प्रतिनिधींना सदर चर्चासत्रास उपस्थित रहाण्याबाबत आपल्या स्तरावर सूचना देण्यात याव्यात.
आपला,