केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम या योजनेचे बँकेत गट शिक्षणाधिकारी व शाळास्तरावर बचत खाते उघडणेबाबत ULLAS-Nav Bharat Saksharta karyakram

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम या योजनेचे बँकेत गट शिक्षणाधिकारी व शाळास्तरावर बचत खाते उघडणेबाबत ULLAS-Nav Bharat Saksharta karyakram

उपरोक्त विषयान्वये, उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम केंद्र व राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत राज्यात राबविल्या जात आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र व राज्यशासनाकडून निधो प्राप्त होत असून तो संबंधित शिक्षणाधिकारी (योजना) यांना निकषानुसार योग्य त्या बाबीवर खर्च करण्यासाठी या कार्यालयामार्फत वितरीत करण्यात येत आहे. सदर योजनेचे तालुका व शाळास्तरावर स्वतंत्र बैंक खाते नसल्याने जिल्हास्तरावरुन निधी वितरीत करताना अडचणी निर्माण होत आहेत.

त्याअनुषंगाने सन २०२४-२५ मध्ये उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत प्राप्त होणारा निधी स्वतंत्र बैंक खाते उघडून त्यामध्ये जमा करण्यात यावा. याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

१. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व), प्रशासनाधिकारी, मनपा (सर्व) व युडायस क्रमांक प्राप्त अनुदानित / विना अनुदानित सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा (इ. १ ली ते इ. १२ वी पर्यंत) यांनी आपल्या नजिकच्या राष्ट्रीयकृत बैंक, शेडयूल कमर्शिअल बैंक व इतर बँकेत (IFSC Code प्राप्त) स्वतंत्र बचत प्रकारचे खाते उघडावे.

२. सदरचे खाते ULLAS-Nav Bharat Saksharta karyakram (उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम) या नावाने उघडावे. त्यानंतर कार्यालयाचे व गावाचे नाव नमूद करावे.

३. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी (तथा सदस्य सचिव, तालुकास्तर नियामक परिषद उल्लास नव भारत साक्षरता

कार्यक्रम), प्रशासनाधिकारी, मनपा (सर्व) व शाळास्तरावर शाळा मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव, शाळा व्यवस्थापन व विकास समिती शाळा व्यवस्थापन समिती यांना बैंक खात्याच्या संबंधित व्यवहारांचे सर्वस्वी अधिकार असतील. ४. गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती), प्रशासनाधिकारी (मनपा) व शाळा मुख्याध्यापक यांनी बँक खात्याशी संबंधित

सर्व व्यवहार, लेखाविषयक सर्व बाबी, लेखापरिक्षण कामकाज, इतर सर्व प्रकारचे लेखाविषयक कामकाज पहावे.

तसेच सर्व दस्तावेज आपल्यास्तरावर जतन करुन ठेवावे.

तरी उपरोक्त नमूदप्रमाणे आपण आपल्या जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी (मनपा), शाळा मुख्याध्यापक यांना आदेशित करावे. तसेच खाते उघडणेबाबतचा वेळोवेळी आढावा घेऊन केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

सहपत्र- जिल्हानिहाय तालुक्यांची यादी

ULLAS-Nav Bharat Saksharta karyakram
ULLAS-Nav Bharat Saksharta karyakram

Leave a Comment