थकीत देयके मंजुरीसाठी वेतन पथकाने शिक्षकांकडून मागितले उघडपणे पैसे thakit vetan grant pathak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थकीत देयके मंजुरीसाठी वेतन पथकाने शिक्षकांकडून मागितले उघडपणे पैसे thakit vetan grant pathak

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वेतन व भविष्य निर्वाह निधी

पथक (माध्यमिक) कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उघडपणे शिक्षकांकडून पैशांची मागणी केल्याचे शिक्षक संघटनांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडले. याप्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली. त्यातच दोन दिवसांचा कॅम्प झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वेतन पथकाने संगणकाचा पासवर्ड बदलून टाकला. याविरोधात शिक्षक संघटनांनी वेतन पथकाचे अधीक्षक राजकुमार शर्मा यांना धारेवर धरले.

नोव्हेंबर २०१९ पासून जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची विविध प्रकारची थकीत देयके प्रलंबित होती. यासाठी सातत्याने संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्याला प्रथमच १३२ कोटींचा निधी शासनाकडून मिळाला होता. मात्र, बिले प्रलंबित असतानाही वेतन पथकाकडून साडेसहा कोटींचा निधी परत पाठविल्याने शिक्षक चांगलेच आक्रमक झाले होते. ज्यांनी पैसे दिले त्यांची बिले मंजूर

वेतन पथकाने एटी झांबरे विद्यालयात दोन दिवसीय कॅम्प

लावला होता. या कॅम्पदरम्यान ज्या शिक्षकांनी पैसे दिले, त्यांची कामे तत्काळ झाल्याचे शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी शर्मा यांना विचारले असता त्यांनी तसे काही नाही ज्यांनी

कागदपत्रे वेळेवर दिले त्यांची बिले मंजूर झाल्याचे शर्मा यांनी सांगितले.

तिसऱ्या दिवशी बदलला पासवर्ड

■ दोन दिवस कॅम्प सुरळीत पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी वेतन पथकाने पासवर्ड बदलून टाकल्याने बिले मंजूर करण्यासाठी मदत करणाऱ्यांना अडचणी आल्या. वेतन पथक कार्यालयातील कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता मोबाइल बंद येत होता. यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवरून संपर्क साधला असता वेतन पथक अधीक्षक शर्मा यांनी पासवर्ड बदलण्यास सांगितले, असे लिपि- काकडून सांगण्यात आले. यामुळे वेतन पथकातील कर्मचाऱ्यांकडून पैसे घेण्याचा विषय अधीक्षकांच्या सांगण्यावरूनच सुरू असल्याचा आरोप शिक्षकांनी केला.

दोषींवर कडक कारवाई करणार

शिक्षक संघटनांनी वेतन पथकाच्या कारभाराविषयी केलेल्या तक्रारीनुसार वेतन पथकांच्या कार्यालयाची सखोल चौकशी करण्यात येणार असून, दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

यावेळी बाळासाहेब पाटील, गोपाळ पाटील, शैलेश राणे, एस. डी. भिरुड, सुनील गरुड, जे. के. पाटील, एच. जी. इंगळे, साधना लोखंडे, नंदन वळींकार, शैलेश राणे सनील सोनार प्रदीप

वाणी, सुनील तायडे, सिद्धेश्वर वाघुळदे, प्रदीप साखरे, राजेश जाधव, योगेश भोईटे, संदीप डोलारे, संजय निकम, आर. आर. धनगर, एम. ओ. चौधरी, अरुण सपकळे, आर. एच. बाविस्कर, यू, यू, पाटील, संभाजी पाटील, सी. सी. वाणी, पुष्पा पाटील आदी उपस्थित होते.

thakit vetan grant pathak 
thakit vetan grant pathak

 

Leave a Comment