सर्व शालेय क्रीडास्पर्धासाठी मार्गदर्शक नियमावली व सर्व खेळांची मैदान मापे rules of school kridaspardha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्व शालेय क्रीडास्पर्धासाठी मार्गदर्शक नियमावली व सर्व खेळांची मैदान मापे pdf rules of school kridaspardha 

१. कबड्डी, २. खो-खो, ३. क्रिकेट, ४. लंगडी, ५. पळणे, ६. लांब उडी, ७. थाळी फेक, ८. गोळा फेक या स्पर्धा विभागातील स्पर्धासाठी नियम ठरविण्यांत आले असून त्याच नियमाने स्पर्धा खेळविले जातील.

क्रीडास्पर्धा नियमावली येथे पहा 👉👉pdf download 

१. सांघिक स्पर्धेत सहभाग संघास प्रवेशिका देण्यांत आलेली आहे तीच भरून देणे.

क्रीडा स्पर्धा क्रीडा प्रतिज्ञा

👉👉pdf download

 

सर्व क्रीडांगण मापे येथे

👉👉pdf download 

२. बीट स्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या संघांनी त्याच प्रवेशीकेवर प्रत्येक खेळाडूची किंवा सांघिक फोटो लावावेत.

खो-खो स्पर्धा नियम येथे पहा

👉👉pdf download 

३. वैयक्तिक स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूची स्वतंत्र प्रवेशिका दिलेलीच भरून देण्यांत यावी.

लंगडी क्रिडा स्पर्धा नियम

👉👉pdf download 

४. प्रवेशिकेवर मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांची स्पर्धेच्या स्तरानुसार सही असावी. अन्यथा प्रवेशिका स्विकारली जाणार नाही. पात्र संघ वंचित राहिल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यांत येईल.

क्रीडा स्पर्धा लहान गट कबड्डी मैदान 👉👉pdf download

५. स्पर्धा २ गटामध्ये खेळविली जाईल.

१. पहिली ते पाचवी वय १२ वर्षे १ जानेवारी पुर्वीचे असावे.

२. सहावी ते आठवी, वय 84 overline r – 8 जानेवारी पुर्वीचे असावे.

६. खेळाडूंनी तालूका स्तरापासून खेळाचे गणवेश किट आवश्यक आहे.

७. वयोगटा बाहेरील खेळाडू खेळल्यास, शाळेच्या बाहेरील खेळाडू खेळल्यास संबंधित संघ व्यवस्थापक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांना जबाबदार धरले जाईल, याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

८. स्पर्धा कालावधीत शाळेतील शिक्षक, संघ व्यवस्थापक, ग्रामस्थ पंचांवर दबाव आणण्यासाठी मैदानामध्ये प्रवेश करतात असे आढळल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यांत येईल.

९. वरील नियमांचे उल्लंघन करणा-या संघांस स्पर्धेतून बाद ठरविला जाईल व त्याची जबाबदारी संबंधित संघ व्यवस्थापक व मुख्याध्यापकांची राहील.

१०. Team Selector संघ निवड समितीद्वारा केंद्र, बीट, तालुका व जिल्हा पातळीवर संघ निवडला जाईल.

केंद्रस्तरीय स्पर्धेतून निवडलेला संघ बीटस्तरीय स्पर्धेत खेळेल.

बीटस्तरीय स्पर्धेतून निवड समिती निवडलेला संघ तालूक्यातून खेळेल. व तालूक्यातून निवडलेला संघ जिल्हास्तरावर खेळेल. (सर्व सांघिक खेळांसाठी लागू)

खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांनी पाळावयाची शिस्त

१. खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांना नेमून दिलेल्या जागेवरच बसले पाहिजे.

२. सामनाधिका-यांशी निर्णयाबाबत सतत आव्हान करू नये.

३. सामनाधिका-यांशी असभ्य वर्तन करू नये.

४. सामनाधिका-यांच्या निर्णयावर विपरीत परिणाम होईल अशी प्रतिक्रिया करू नये.

५. विरुद्ध संघातील खेळाडू विषयी वैयक्तिक पातळीवर अश्लील भाषा उच्चारू नये.

६. सामना चालू असताना क्रीडांगणाबाहेर हेतूपुरस्सर निर्देशन करू नये.

७. सामना चालू असताना किंवा सामन्याचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी पंचप्रमुखांच्या परवानगी शिवाय क्रीडांगण सोडू नये.

खेळाडूंचे संचलन व मानवंदना

ज्या मैदानावर उ‌द्घाटन कार्यक्रम होणार आहे. तिथे सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण करावे. संचलन करणा-या विद्यार्थ्यांना सभारंभापूर्वीच नियोजित जागी उभे करावे त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक करणारे विद्यार्थी असल्यास संचलन करणा-या विद्यार्थ्यांच्या मागे तयार असावेत. पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज रहावे.

प्रमुख पाहूणे मानवंदना स्विकारण्यासाठी व्यासपीठावर उभे राहिल्यावर संकेत / आज्ञा मिळताच खेळाडूच्या संचलनास सुरुवात होईल. सदरहू संचलनास नेतृत्व गतवर्षीचा विजेता संघ / तालूका करेल. त्या संघापाठोपाठ इतर संघांनी आद्याक्षरांच्या क्रमानुसार संचलन करावे व अंतिम संघ हा संयोजक / यजमान संघ असावा.

प्रत्येक संघासमोर फलकधारक, संघनायक. ध्वजधारक असा क्रम असावा. प्रत्येक संघाने व्यासपीठासमोरून जाताना नेमून दिलेल्या जागेपासून संघनायकाच्या आदेशानुसार “दाहिने देख” करून प्रमुख पाहूण्यांना मानवंदना द्यावी. प्रमुख पाहुण्यांनी मानवंदना स्विकारावी. नेमून दिलेल्या जागी संघनायकाने “सामने देख” ची आज्ञा द्यावी व क्रीडांगणावर नेमून दिलेल्या जागी आपला संघ उभा करावा.

खेळाडूंची संख्या, जागा, मुले, मुली इत्यादी बाबींचा विचार करुन संयोजकांनी खेळाडूंना उभे राहण्यासाठी रचना करावी.

क्रीडाज्योत

क्रीडास्पर्धाच्या वेळी क्रीडाज्योत आणण्याची प्रथा ऑलिंपिक्सपासून पडली याच धर्तीवर सध्या सर्वच क्रीडास्पर्धाच्या उद्घाटनाच्यावेळी क्रीडाज्योत मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आणली जाते. स्थानिक क्रीडास्पर्धाच्या उद्घाटनाच्या दिवशी क्रीडाज्योत ही त्या ठिकाणच्या एखाद्या स्थळापासून, स्थानिक पवित्र ठिकाणापासून किंवा जवळच्या राष्ट्रीय स्मारकापासून प्रज्वलीत करून स्थानिक खेळाडू क्रीडाज्योत हातात घेऊन धावत समारंभाच्या ठिकाणी येतात.

मैदानात आल्यानंतर सन्मानपूर्वक ही ज्योत कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा प्रमुख अतिथींकडे दिली जाते. नंतर ही ज्योत घेऊन अध्यक्ष / प्रमुख अतिथी बाजूस असलेल्या मोठया क्रीडाज्योतीकडे जाऊन हातातल्या क्रीडाज्योतीने मोठी ज्योत प्रज्वलित करतील.

क्रीडाशपथ

आम्ही अशी शपथ घेतो की, आम्ही या क्रीडामहोत्सवात सचोटीने भाग

घेऊ. क्रीडा महोत्सवी स्पर्धाच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व

ख-या खिलाडूवृत्तीने वागून आमच्या शाळा, केंद्र, बीट, तालूका, जिल्हा, राज्य

व देशाच्या सन्मान व खेळाचा गौरव होईल अशा ईष्र्येने या क्रीडा महोत्सवात भाग

घेऊ.

जयहिंद !

Leave a Comment