शिक्षण सप्ताह दिवस सहावा  शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे वार शनिवार दि. २७/०७/२०२४ Eco clubs for Mission LIFE Day

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षण सप्ताह दिवस सहावा  शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे वार शनिवार दि. २७/०७/२०२४ Eco clubs for Mission LIFE Day

Eco clubs for Mission LIFE Day

शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि #Plant4 Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दि.२७/०७/२०२४ रोजी आयोजन करणे.

👉👉👉👉शिक्षण सप्ताह शासन निर्णय येथे पहा click here 

अ) शाळेमध्ये Eco clubs for Mission LIFE या थीम अंतर्गत #Plant4Mother अभियान आयोजित करण्यासाठी सूचना

वृक्षारोपण मोहिमेचे दि.२७/०७/२०२४ रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे. शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे. शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान ३५ रोपे लावावीत.

👉👉👉शिक्षण सप्ताहातील फोटो व्हिडिओ या अधिकृत लिंक वर अपलोड करा click here

विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग :- विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावीत. यामुळे विद्यार्थी, त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल.

नावांचे फलक लावणे : विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा.

रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे:- विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक/अध्यक्ष/सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी.

वरील उपक्रमाच्या अनुषंगाने-

१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत. https://docs.google.com/spreadsheets/d/13mep-

nPOy8gmyX5HR4D1Swob OztSgb15eQRBNrFMwo/edit?gid=15896978#gid=15896978

२. सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल संभाजात जाणीवजागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो #Plant4Mother आणि ॥ एक पेड़ माँ के नाम हे हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावेत.

2 thoughts on “शिक्षण सप्ताह दिवस सहावा  शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे वार शनिवार दि. २७/०७/२०२४ Eco clubs for Mission LIFE Day”

  1. Eco club president Anish Maind . Members of Eco club Ankita Ramteke ,Yash Golar,Gaurang Kawalkar.

Leave a Comment